भारतीय दंड संहिता १८६०
कलम २४० :
भारतीय नाणे नकली आहे याची जाणीव असताना ते सुपूर्द (हवाली) करणे :
(See section 179 and 180 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : भारतीय नाण्याबाबत तसेच करणे (कलम २३९ प्रमाणे)
शिक्षा :१० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
स्वत:च्या कब्जात असलेले कोणतेही १.(भारतीय नाणे) याची नक्कल असलेले नकली नाणे ज्या वेळी आपल्या कब्जात आले त्या वेळी ते १.(भारतीय नाण्याची) नक्कल असल्याचे माहीत असताना जो कोणी कपटीपणाने किंवा कपट करता यावे या उद्देशाने कोणत्याही व्यक्तीकडे ते सुपूर्द (हवाली) करील किंवा ते स्वीकारण्यास कोणत्याही व्यक्तीला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करील त्याला दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
——–
१. अनुकूलन आदेश १९५० द्वारे क्वीनचे नाणे याऐवजी समाविष्ट करण्यात आले.