भारतीय दंड संहिता १८६०
कलम २०७ :
समपऱ्हत (जप्ती) किंवा हुकूमनाम्याची अंमलबजावणी म्हणून मालमत्तेचे अभिग्रहण (जप्ती) होऊ नये याकरिता कपटीपणाने तिच्यावर दावा सांगणे :
(See section 244 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : समपऱ्हत म्हणून किंवा शिक्षादेशाखालील द्रव्यदंडाची पूर्ती म्हणून किंवा हुकूमनाम्याची अंमलबजावणी म्हणून मालमत्तेचे अभिग्रहण होऊ नये यासाठी, तिच्यावर हक्क नसताना दावा सांगणे किंवा तीवरील कोणत्याही हक्कासंबंधी फसवणूक करणे.
शिक्षा :२ वर्षांचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——–
जर कोणी एखाद्या मालमत्तेवर किंवा तिच्यामधील हितसंबंधावर आपला हक्क किंवा साधिकार मागणीहक्क (दावा) नाही हे माहीत असून कपटीपणाने ते स्वीकारले, घेतले किंवा त्यावर दावा सांगितला अथवा कोणतीही मालमत्ता किंवा तिच्यातील हितसंबंध यांवरील हक्कासंबंधी कोणत्याही प्रकारे फसवणूक केलीर आणि त्यायोगे ती मालमत्ता किंवा तिच्यातील हितसंबंध न्यायालय किंवा अन्य सक्षम प्राधिकारी याच्याकडून जो अधिघोषित झाला आहे, किंवा अधिघोषित होणे संभवनीय असल्याची स्वत:ला जाणीव आहे अशा एखाद्या न्यायनिर्णयाअन्वये समपऱ्हत (जप्ती) म्हणून किंवा द्रव्यदंडाची पूर्ती करण्यासाठी घेतले जाऊ नये अथवा एखाद्या दिवाणी दाव्यात एखाद्या न्यायालयाकडून जो काढण्यात आला आहे किंवा काढला जाणे संभवनीय असल्याची स्वत:ला जाणीव आहे अशा हुकूमनाम्याच्या किंवां आदेशाच्या अंमलबजावणीत घेतले जाऊ नये असा त्याचा उद्देश असेल तर, त्याला दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.