भारतीय दंड संहिता १८६०
कलम १७५ :
लोकसेवकाकडे १.(दस्तऐवज किंवा इलेट्रॉनिक्स अभिलेख) हजर करण्यास बद्ध (बांधलेला) असलेल्या व्यक्तीने तो हजर करण्याचे टाळणे:
(See section 210 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोकसेवकाकडे दस्तऐवज हजर किंवा स्वाधीन करण्यास विधित: बद्ध असलेल्या व्यक्तीने असा दस्तऐवज हजर करण्याचे उद्देशपूर्वक टाळणे.
शिक्षा :१ महिन्याचा साधा कारावास किंवा ५०० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :अपराध ज्या न्यायालयात घडला असेल ते न्यायालय फौजदारी प्रक्रिया संहिता प्रकरण सव्वीसच्या उपबंधांच्या अधीनतेने; किंवा जर न्यायालयात घडला नसेल तर, कोणताही दंडाधिकारी.
———–
अपराध : जर दस्तऐवज न्यायालयात हजर करणे किंवा त्याच्या स्वाधीन करणे आवश्यक केले असेल तर.
शिक्षा :६ महिन्याचा साधा कारावास किंवा १००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :अपराध ज्या न्यायालयात घडला असेल ते न्यायालय फौजदारी प्रक्रिया संहिता प्रकरण सव्वीसच्या उपबंधांच्या अधीनतेने; किंवा जर न्यायालयात घडला नसेल तर, कोणताही दंडाधिकारी.
———–
लोकसेवक म्हणून एखाद्याकडे कोणताही १.(दस्तऐवज किंवा इलेट्रॉनिक्स अभिलेख) हजर करण्यास, अगर स्वाधीन करण्यास विधित: बद्ध असून जो कोणी ते हजर करण्याचे किंवा स्वाधीन करण्याचे टाळील त्याला, एक महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या साध्या कारावासाची शिक्षा, किंवा पाचशे रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील;
किंवा जर २.( दस्तऐवज किंवा इलेट्रॉनिक्स अभिलेख) न्यायालयाकडे हजर करावयाचा किंवा स्वाधीन करावयाचा असेल तर, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची, किंवा एक हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
उदाहरण :
२.(जिल्हा न्यायालयासमोर) दस्तऐवज हजर करण्यास विधित: बद्ध असलेला (क) तो दस्तऐवज सादर करण्याचे उद्देशपूर्वक टाळतो. (क) ने या कलमामध्ये व्याख्या करण्यात आलेला अपराध केलेला आहे.
———–
१. २००० चा अधिनियम क्र.२१, कलम ९१ द्वारे मूळ मजकूराऐवजी घातला. १७ ऑक्टोबर २००० पासून
२. २००५ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम ४४ अन्वये समाविष्ट केले.
३. अनुकूलन आदेश जिल्हा न्यायाधीश याऐवजी समाविष्ट करण्यात आले.