Ipc कलम १३३ : भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला त्यांचे वरिष्ठ अधिकारी आपले पदकार्य बजावत असताना त्यांच्यावर हमला करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम १३३ :
भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला त्यांचे वरिष्ठ अधिकारी आपले पदकार्य बजावत असताना त्यांच्यावर हमला करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देणे :
(See section 161 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अधिकाऱ्याला, भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला त्याचा वरिष्ठ अधिकारी आपले पदकार्य बजावत असताना त्याच्यावर हमला करण्यास अपप्रेरणा देणे.
शिक्षा :३ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी
————-
जो कोणी १.(भारत सरकारच्या) भूसेनेतील, २.(नौसेनेतील किंवा वायुसेनेतील) अधिकाऱ्यांना, भूसैनिकाला, २.(नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला) कोणताही वरिष्ठ अधिकारी आपले पदकार्य बजावीत असताना त्यांच्यावर हमला करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देईल तर त्याला, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
———
१. अनुकूलन आदेश १९५० द्वारा क्वीन याऐवजी दाखल करण्यात आले.
२. १९२७ चा अधिनियम १० – कलम २ व अनुसूची १ यांद्वारे मूळ मजकुराऐवजी दाखल केले.

Leave a Reply