Ipc कलम १०३ : मालमत्तेचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क हा मृत्यू घडवून आणण्याइतपत केव्हा व्यापक असतो :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम १०३ :
मालमत्तेचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क हा मृत्यू घडवून आणण्याइतपत केव्हा व्यापक असतो :
(See section 41 of BNS 2023)
जो अपराध करण्यात आल्यामुळे किंवा करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे मालमत्तेचा खाजगीरीत्या बचाव करण्याचा हक्क वापरण्याचा प्रसंग उद्भवतो तो अपराध यात यापुढे नमूद केलेल्यांपैकी कोणत्याही वर्णनाचा असेल तर, कलम ९९ मध्ये उल्लेखिलेल्या निर्बंधांच्या अधीनतेन, तो हक्क इच्छापूर्वक अपकृत्य करणाऱ्याचा मृत्यू घडवून आणण्याइतपत किंवा त्याला अन्य कोणतीही अपाय करण्याइतपत व्यापक असतो. ती वर्णने अशी :
पहिले- जबरी चोरी.
दुसरे – रात्रीची घरफोडी.
तिसरे – यात जी इमारत, तंबू किंवा जलयान माणसांचे वसतिस्थान म्हणून अगर मालमत्ता ठेवण्यांचे स्थान म्हणून वापरले जाते अशा कोणत्याही इमारतीला, तंबूला किंवा जलयानाला आग लावून आगळीक करणे;
चौथा- खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क जर वापरला नाही, तर मृत्यू किंवा जबर दुखापत होईल अशी ज्यामुळे वाजवी धास्ती निर्माण होईल, अशा परिस्थितीत चोरी, आगळीक (अपक्रिया) किंवा गृह- अतिक्रमण.
१.(पाचवे- जाळपोळ करून अगर स्फोटके वापरून आगळीक (अपक्रिया) करणे. यात सरकार, स्थानिक अधिकारी किंवा सरकारी मंडळ किंवा सरकारी कंपनी याची कोणत्याही प्रकारची मिळकत तसेच सरकारी रेल्वे-टड्ढामवे अगर कोणतेही वाहन ज्यामधून भाडयाने अगर मोबदल्याने प्रवाशांची वाहतूक केली जाते. यात सदरची मिळकत सरकारतर्फे वापरली जात असेल, किंवा तसा इरादा असेल तरी पुरेसे आहे.)
———
१. १९७१ चा महाराष्ट अधिनियम क्रमांक १९ चा कलम २६ नुसार घातले.

Leave a Reply