भारतीय दंड संहिता १८६०
कलम ९५ :
अल्पसा अपाय करणारी कृती (कार्य) :
(See section 33 of BNS 2023)
एखाद्या गोष्टीमुळे (कृतीमुळे) होणारा कोणताही अपाय अत्यंत अल्प असेल की, कोणतीही सर्वसामान्य बुध्दीची आणि वृत्तीची व्यक्ती अशा अपायाबद्दल तक्रार करणार नाही तर, तिच्यामुळे तसा अपाय झाला, किंवा तो व्हावा असा उद्देश होता, किंवा तो होण्याचा संभव असल्याची जाणीव होती, या कारणाने कोणतीही कृती अपराध होत नाही.