Ipc कलम ८५ : स्वत:च्या इच्छेविरूध्द नशा चढविल्यामुळे निर्णय घेण्यास असमर्थ अशा व्यक्तीची कृती :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ८५ :
स्वत:च्या इच्छेविरूध्द नशा चढविल्यामुळे निर्णय घेण्यास असमर्थ अशा व्यक्तीची कृती :
(See section 23 of BNS 2023)
जी व्यक्ती एखादी गोष्ट (कृती) करण्याच्या वेळी त्या कृतीचे स्वरूप काय आहे अथवा आपण जे करत आहोत ते गैर आहे किंवा कायद्याच्या विरूध्द आहे हे समजण्यास नशेमुळे असमर्थ असेल त्या व्यक्तीने केलेली अशी कोणतीही गोष्ट (कृती) अपराध होत नाही; मात्र ज्यामुळे तिला नशा चढली ते द्रव्य तिला तिच्या नकळत किंवा इच्छेविरूध्द पाजण्यात आलेले असले पाहिजे.

Leave a Reply