भारतीय न्याय संहिता २०२३
असहाय व्यक्तीची देखभाल करणे व तिच्या गरजा पुरवणे याबाबतच्या संविदेचा भंग याविषयी :
कलम ३५७ :
असहाय व्यक्तीची देखभाल करणे व तिच्या गरजा पुरवणे याबाबतच्या संविदेचा भंग :
कलम : ३५७
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बालवय, मनोविकलता किंवा रोग यांमुळे असहाय अशा व्यक्तीची देखभाल करण्यास किंवा तिच्या गरजा पुरवण्यास बांधलेले असता तसे इच्छापूर्वक टाळणे.
शिक्षा : ३ महिन्यांचा कारावास, किंवा ५००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अपराध्याने ज्या व्यक्तीबरोबर संविदा केली ती व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
अल्पवय, किंवा मनोविकलता यामुळे, अथवा रोग किंवा शारीरीक दुबळेपणा यामुळे जी कोणतीही व्यक्ती असहाय असेल, किंवा तिच्या स्वत:च्या सुरक्षिततेची तजवीज करण्यास, किंवा तिच्या स्वत:च्या गरजा पूर्ण करण्यास असमर्थ असेल त्या व्यक्तीची देखभाल करण्यास, किंवा तिच्या गरजा पुरवण्यास विधित: बद्ध असलेला जो कोणी तसे करण्याचे इच्छापूर्वक टाळील त्याला, तीन महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा पाच हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.