विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६
कलम ४ :
नजरकैदी :
१.(१) ज्या कोणत्याही विदेशी व्यक्तीबाबत, तिला स्थानबद्ध किंवा बंदिवान करण्यात यावे असे सांगणारा कलम ३ च्या पोटकलम (२) च्या खंड (छ) खालील आदेश अंमलात असेल तिला (यात यापुढे नजरकैदी म्हणून निर्दिष्ट केले आहे) केन्द्र शासन वेळोवेळी आदेशाद्वारे ठरवून देईल अशा ठिकाणी व अशा पद्धतीने आणि निर्वाह, शिस्तपालन व गुन्ह्यांना शिक्षा आणि शिस्तभंग यांसंबंधी ते ठरवून देईल अशा शर्तीच्या अधीनतेने स्थानबद्ध किंवा बंदिवान करण्यात येईल.)
२) ज्या कोणत्याही विदेशी व्यक्तीच्या बाबतीत, काही विदेशी व्यक्तींच्या देखरेखीखाली निवासासाठी अलग राखून ठेवलेल्या एखाद्या ठिकाणी तिने राहावे असे फर्मावणारा कलम ३ च्या पोटकलम (२) च्या खंड (ङ) खालील आदेश अंमलात असेल ती व्यक्ती (यात यापुढे पारोलबद्ध व्यक्ती म्हणून निर्दिष्ट केले आहे), त्या ठिकाणी राहात असताना, निर्वाह, शिस्तपालन व गुन्ह्यांना शिक्षा आणि शिस्तभंग यांबाबतच्या ज्या शर्ती केन्द्र शासन वेळोवेळी आदेशाद्वारे ठरवून देईल त्या शर्तींना अधीन राहील.
२.(३) कोणत्याही व्यक्तीस पुढील गोष्टी करता येणार नाहीत :-
(a)क) नजरकैदी किंवा परोलबद्ध व्यक्तीस हवालतीतून किंवा तिच्या निवासासाठी अलग राखून ठेवलेल्या जागेतून निसटून जाण्यास जाणूनबुजून साहाय्य करणे किंवा अशा प्रकारे निसटून गेलेल्या नजरकैदीस किंवा पारोलबद्ध व्यक्तीस जाणूनबुजून आसरा देणे, किंवा
(b)ख) नजरकैदी किंवा पारोलबद्ध व्यक्ती निसटून गेली असता,ती व्यक्ती पकडली जाऊ नये, त्याकामी व्यत्यय यावा किंवा हस्तक्षेप व्हावा अशा हेतूने त्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारचे साहाय्य करणे.
४) भारतातील ज्या ठिकाणी नजरकैदी किंवा पारोलबद्ध व्यक्तींना स्थानबद्धतेत किंवा, प्रकरणपरत्वे, निर्बंधात ठेवण्यात आलेले असेल त्या ठिकाणी जाण्याबाबत आणि त्याठिकाणी करावयाच्या वर्तणुकीबाबत नियमन करण्याकरिता, आणि विहित करण्यात येतील
———-
१. १९६२ चा अधिनियम ४२ द्वारे समाविष्ट केले. १९५७ चा अधिनियम ११ याच्या कलम ५ द्वारे पूर्वीचे पोटकलम (१) वगळण्यात आले होते (१९-१-१९५७ रोजी व तेव्हापासून).
२. १९६२ चा अधिनियम क्रमांक ४२ याच्या कलम ३ द्वारे पोटकलम (३) व (४) याऐवजी समाविष्ट केले.
