Ndps act कलम ७८ : राज्य शासनाचे नियम करण्याचे अधिकार :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ७८ :
राज्य शासनाचे नियम करण्याचे अधिकार :
१) या अधिनियमाच्या इतर तरतुदींना अधीन राहून राज्य शासनाला शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी नियम करता येतील.
२) यापूर्वीच्या अधिकारांचा सर्वसाधारणपणास बाधा न आणता हे नियम, पुढीलपैकी कोणत्याही किंवा सर्व गोेष्टींसाठी तरतूद करू शकतील.
अ) कलम ७१ च्या पोटकलम (१) नुसार राज्यशासनाकडे किंवा अन्यत्र नोंदणी करण्यात आलेल्या व्यसनाधीन व्यक्तींना वैद्यकीय गरज म्हणून गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापाराला उत्तेजन देणारे पदार्थ ज्या शर्तींवर व ज्या रीतीने पुरवण्यात येतील त्या अटी व ती रीत;
ब) कलम ७१ च्या पोटकलम (१) नुसार स्थापन करण्यात आलेल्या केंद्रांची आस्थापना. नेमणूक, देखभाल, व्यवस्थापन व पर्यवेक्षण आणि अशा केंद्रांमध्ये नेमण्यात आलेल्या केंद्रांची आस्थापना, नेमणूक, देखभाल, व्यवस्थापन व पर्यवेक्षण आणि अशा केंद्रांमध्ये नेमण्यात आलेल्या व्यक्तींच्या नेमणुका, प्रशिक्षण, अधिकार व कर्तव्ये;
क) विहित करावयाच्या व विहित करता येतील अशा इतर बाबी.
३) राज्य शासनाने या अधिनियमान्वये केलेला प्रत्येक नियम तो करण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर त्या राज्याच्या विधान मंडळासमोर मांडण्यात येईल.

Leave a Reply