गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ७० :
केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने नियम करताना आंतरराष्ट्रीय करार विचारात घेणे :
या अधिनियमान्वये नियम करण्याचे अधिकार केंद्र सरकारला किंवा राज्य शासनाला देण्यात आले असतील अशा बाबतीत प्रकरणपरत्त्वे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार नियम तयार करताना या अधिनियमाच्या तरतूदींना अधिन राहून गुंगीकारक औषधी द्रव्ये याबाबतचा एकेरी करार, १९६१ सदर करारामध्ये सुधारणा करणारा १९७२ चा मूळ करार मसुदा आणि मनोव्यापार उत्तेजित करणारे पदार्थ करार १९७१ चा भारत एक पक्षकार असलेल्या कराराच्या तरतुदी आणि ज्यामध्ये भारत पक्षकार होऊ शकेल अशा गुंगीकारक औषधी द्रव्ये किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ यांच्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय कराराच्या तरतुदी विचारात घेईल.
