गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६८-यु :
ताबा घेण्याचे अधिकार :
१) या प्रकराणन्वये कोणतीही मालमत्ता केंद्र सरकारकडे जमा करण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले असेल किंवा बाधित व्यक्तीने कलम ८ के च्या पोट कलम (१) अन्वये देय असलेली दंडाची रक्कम त्याच कलमाच्या पोटकलम (३) अन्वये त्यासाठी अनुज्ञा दिलेल्या वेळेत भरण्यात कसूर केली असेल अशा बाबतीत, सक्षम प्राधिकरण बाधित व्यक्तीला त्याचप्रमाणे मालमत्ता ताब्यात असेल अशा इतर कोणत्याही व्यक्तीला, आदेश बजावण्यात आल्यापासून तीस दिवसांच्या आत त्या मालमत्तेचा ताबा कलम ६८ ग अन्वये नेमणूक करण्यात आलेल्या प्रशासकाकडे किंवा त्याने या बाबतीत योग्य रीतीने प्राधिकार दिलेल्या अन्य कोणत्याही व्यक्तीकडे देण्याबाबत आदेश देईल..
२) कोणतीही व्यक्ती पोटकलम (१) अन्वये देण्यात आलेल्या आदेशाचे पालन करण्याचे नाकारील किंवा तसे करण्यात कसूर केल्यास, प्रशासक अशा मालमत्तेचा ताबा घेऊ शकेल आणि त्या प्रयोजनासाठी आवश्यक अशा बलाचा वापर करू शकेल.
३)पोटकलम (२)मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, प्रशासक, कोणत्याही मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी पोटकलम (१) अन्वये कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याच्या सेवा मागणी करीता मदत करण्यास उल्लेखिल त्या सेवा मागणी चे पालन करण्यास त्या पोलीस अधिकाऱ्याचे कर्तव्य असेल.
