भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २९५ :
अश्लील वस्तू बालकाला विकणे, इत्यादी :
कलम : २९५
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अश्लील वस्तू बालकाला विकणे इत्यादी.
शिक्षा : पहिल्या दोषसिद्धीअन्ती ३ वर्षाचा कारावास, व २००० रुपये द्रव्यदंड, आणि दुसरी किंवा त्यानंतर दोषसिद्धी झाल्यास ७ वर्षांचा कारावास व ५००० रुपये द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जो कोणी कलम २९४ मध्ये निर्देशिलेली (दर्शविलेली) अशी कोणतीही अश्लील वस्तू कोणत्याही बालकाला विकेल, भाडयाने देईल, वितरीत करील, प्रदर्शित करील किंवा तिच्याकडे प्रसृत करील त्याला, पहिला अपराध दोषसिद्धीअन्ती (शाबीत झाल्यावर) तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारवासाची शिक्षा आणि दोन हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची आणि दुस?्या किंवा त्यानंतर दोषसिद्धी (शिक्षा झाल्यास), सात वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल.