Ndps act कलम ६८-एन : अपील न्यायधिकरणाची रचना :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६८-एन :
अपील न्यायधिकरणाची रचना :
१) केंद्र शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे; सरकारजमा केलेल्या मालमत्तेसाठी एक अपील न्यायाधिकरण म्हणून संबोधावयाच्या रचना करू शकेल. यामध्ये अध्यक्ष आणि केंद्र शासनाला योग्य वाटतील इतके (शासनाच्या सहसचिवापेक्षा कमी दर्जाचे नसतील असे केंद्र शासनाचे अधिकारी असलेले) व त्या शासनाकडून कलम ६८ फ, कलम ६८ आय, कलम ६८ के चे पोटकलम (१) किंवा कलम ६८ ल अन्वये देण्यात आलेल्या आदेशांच्या विरूद्धच्या अपिलांची सुनावणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले इतर सदस्य यांचा समावेश असेल.
२) अपील न्यायाधिकरणाचा अध्यक्ष हा सर्वोच्च न्यायालयाचा किंवा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असेल अशी किंवा होती अशी किंवा होण्यास पात्र असेल अशी व्यक्ती असेल.
३) अध्यक्ष व इतर सदस्य यांच्या सेवाशर्ती व अटी विहित करण्यात येतील त्याप्रमाणे असतील.

Leave a Reply