Ndps act कलम ६८-अ : प्रयुक्ती :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
प्रकरण ५-अ :
बेकायदेशीर व्यापारातून मिळालेली किंवा त्यात वापरलेली मालमत्ता जप्त करणे :
कलम ६८-अ :
प्रयुक्ती :
१) या प्रकरणाच्या तरतुदी फक्त पोटकलम (२) मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या व्यक्तींनाच लागू होतील.
२) पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या व्यक्ती पुढील प्रमाणष आहेत :
अ) या अधिनियमान्वये दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीची कैदेची शिक्षा होण्यायोग्य अपराधासाठी दोषी ठरविण्यात आलेली असेल अशी प्रत्येक व्यक्ती,
ब) तशाच प्रकारच्या अपराधासाठी भारताबाहेरील फौजदारी अधिकारिता असणाऱ्या एखाद्या सक्षम न्यायालयाने दोषी ठरवली असेल अशी प्रत्येक व्यक्ती.
क) गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ यांचा बेकायदेशीर व्यापार करण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९८८ (१९८८ चा ४६) किंवा जम्मू व काश्मीरचा गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ यांच्या बेकायदेशीर व्यापारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८८ (१९८८ चा जम्मू व काश्मीर अधि. २३) या अन्वये जिच्या संबंधात प्रतिबंधक स्थानबद्धता आदेश काढण्यात आला असेल अशी प्रत्येक व्यक्ती;
परंतु, असा स्थानबद्धता आदेश मुक्त आदेशाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या सल्लागार समितीच्या अहवालानुसार मागे घेण्यात आलेला नसावा किंवा असा स्थानबद्धता आदेश सक्षम अधिकारिता असणाऱ्या न्यायालयाने बाजूला सारलेला नसला पाहिजे.
कक) या अधिनियमाअन्वये दहा वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा असलेला अपराधाकरिता अटक केलेली किंवा अटकेचा वॉरंट किंवा अधिकारपत्र जारी करण्यात आलेले कोणतीही व्यक्ती आणि अन्य कोणत्याही देशाच्या सुसंगत कायद्याखालील अशाच अपराधासाठी, अटक केलेली किंवा अटकेचा वॉरंट किंवा अधिकार पत्र जारी करण्यात आलेली कोणतीही व्यक्ती,
ड) खंड (अ) किंवा खंड (ब) किंवा खंड (क) किंवा खंड (कक) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या एखाद्या व्यक्तीची नातेवाईक असलेली प्रत्येक व्यक्ती;
ई) खंड (अ) किंवा खंड (ब) किंवा खंड (क) किंवा खंड (कक) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या व्यक्तीची सहयोगी असलेली प्रत्येक व्यक्ती;
फ) खंड (अ) किंवा खंड (ब) किंवा खंड (क) किंवा खंड (कक) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेली एखादी व्यक्ती पूर्वी कोणत्याही वेळी धारण करीत असलेली कोणतीही मालमत्ता धारण करणारा कोणताही धाकर (या खंडात यापुढे विद्यमानधारक म्हणून निर्देश करण्यात आलेला) परंतु, विद्यमान धारक किंवा यथाशक्ती अशा व्यक्तीच्या नंतर आणि विद्यमान धारकाच्या पूर्वी अशा व्यक्तीच्या नंतर आणि विद्यामान धारकाच्या पूर्वी अशी मालमत्ता धारण करणारी व्यक्ती सद्हेतूने आणि पुरेशा मोबदल्यासाठी हस्तांतरित होती किंवा झाली आहे असे नसले पाहिजे.

Leave a Reply