गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ५५ :
जप्त करण्यात आलेल्या आणि पोचवण्यात आलेल्या वस्तू पोलिसाने ताब्यात घेणे :
एखाद्या पोलिस ठाण्याच्या स्थानिक क्षेत्रामध्ये जप्त करण्यात आलेल्या सर्व वस्तू आणि पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याकडे देण्यात येतील अशा वस्तू त्या प्रभारी अधिकाऱ्याने ताब्यात घेतल्या पाहिजेत आणि दंडाधिकाऱ्याचे आदेश मिळेपर्यंत सुरक्षित कक्षात ठेवल्या पाहिजेत आणि अशा वस्तूंच्या सोबत असणाऱ्या किंवा ज्याला या कामावर प्रतिनियुक्त करण्यात आले असेल अशा कोणत्याही अधिकाऱ्याला त्या वस्तूंवर त्याची मुद्रा उमटविण्याची किंवा अशा वस्तूंचे किंवा त्यामधील नमुने काढून घेण्याची मूभा दिली पाहिजे आणि अशा प्रकारे घेण्यात आलेल्या सर्व नमुन्यांवर त्या पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याने ही मुद्रा उमटवली पाहिजे.
