गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ५०-अ :
१.(नियंत्रीत निष्पादनाच्या बांधीलकीचे अधिकार :
कलम ४ च्या पोट कलम ३ नुसार, गुंगीकारक औषधी द्रव्य नियंत्रण विभागाचा महासंचालक किंवा याबाबत त्याने प्राधिकृत केलेला अन्य कोणताही अधिकारी, या अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरीही, पुढील बाबतीत माल पाठविण्याबाबत नियंत्रीत निष्पादनाची बांधीलकी देऊ शकेल-
अ) भारतातील कोणतेही स्थळ,
ब) परदेशातील स्थळाबाबत, त्या देशातील संबंधीत सक्षम अधिकारीतेकडे संपर्क करून विविक्षीत पद्धतीने निश्चित करणे.)
——–
१. २००१ चा अधिनियम क्रमांक ९ याच्या कलम २३ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
