Ndps act कलम ४९ : वाहन थांबवण्याचे आणि त्याची झडती घेण्याचे अधिकार :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ४९ :
वाहन थांबवण्याचे आणि त्याची झडती घेण्याचे अधिकार :
कोणत्याही प्राण्याचा किंवा वाहनाचा कोणतेही अमली पदार्थ किंवा गुंगीकारक औषधे १.(किंवा नियंत्रीत पदार्थ) याच्या वाहतुकीसाठी वापर करण्यात येत आहे किंवा येण्याच्या बेतात आहे, असे कलम ४२ खाली प्राधिकार देण्यात आलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला सकारण वाटेल व त्यामुळे या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीचा भंग झाला आहे किंवा होत आहे किंवा तो कोणत्याही वेळी होण्याची शक्यता आहे असा संशय असेल, तर तो अशा प्राण्याला किंवा वाहनाला थांबवू शकेल किंवा जर ते हवाई जहाज असल्यास, त्याला उतरवण्यास भाग पाडऊ शकेल आणि –
अ) त्या वाहनाचा किंवा त्याच्या कोणत्याही भागाचा शोध घेत येईल किंवा त्याची झडती घेऊ शकेल.
ब) प्राण्यावर लादलेला किंवा वाहनात असलेला माल याची तपासणी किंवा झडती घेऊ शकेल.
क) प्राणी किंवा वाहन यांचा थांबविणे आवश्यक असल्यास, त्याला थांबवण्यासाठी तो सर्व कायदेशरी उपायांचा वापर करू शकेल आणि असे उपाय निरूपयोगी ठरती अशा बाबतीत असा प्राणी किंवा वाहन यांवर गोळी मारू शकेल.
——–
१. २००१ चा अधिनियम क्रमांक ९ याच्या कलम २१ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply