Bns 2023 कलम २७८ : एखादे औषधीद्रव्य वेगळे औषधीद्रव्य किंवा सिध्दपदार्थ म्हणून विकणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २७८ :
एखादे औषधीद्रव्य वेगळे औषधीद्रव्य किंवा सिध्दपदार्थ म्हणून विकणे :
कलम : २७८
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणतेही औषधीद्रव्य किंवा वैद्यकिय सिद्धपदार्थ, वेगळे औषधीद्रव्य किंवा वैद्यकिय सिद्धपदार्थ म्हणून समजूनसवरुन विकणे किंवा दवाखान्यातून देणे.
शिक्षा : ६ महिन्यांचा कारावास, किंवा ५००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कोणतेही औषधी द्रव्य किंवा औषधीय सिध्दपदार्थ जो कोणी वेगळे औषधिद्रव्य किंवा सिद्धपदार्थ म्हणून जाणीवपूर्वक विकेल किंवा विकत देऊ करील किंवा विक्रीसाठी मांडेल किंवा औषधोपचाराच्या प्रयोजनांसाठी (कारणांकरिता) दवाखान्यामार्फत देईल त्याला, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा पाच हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply