Bns 2023 कलम २७७ : भेसळयुक्त औषधी द्रव्यांची विक्री :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २७७ :
भेसळयुक्त औषधी द्रव्यांची विक्री :
कलम : २७७
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणतेही औषधीद्रव्य किंवा औषधीय सिद्धपदार्थ, त्यात भेसळ करण्यात आल्याचे माहीत असताना विक्रीसाठी ठेवणे किंवा दवाखान्यातून देणे.
शिक्षा : ६ महिन्यांचा कारावास, किंवा ५००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कोणतेही औषधी द्रव्य किंवा औषधीय सिध्दपदार्थ याची गुणकारिता कमी होईल, किंवा त्याचे कार्य बदलेल किंवा ते अपायकारक होईल अशा रीतीने त्यात भेसळ करण्यात आलेली आहे हे माहीत असून जो कोणी ते विकेल किंवा विकत देऊ करील किंवा विक्रीसाठी मांडील किंवा ते निर्भेळ म्हणून औषधपचाराच्या प्रयोजनांसाठी एखाद्या दवाखान्यामार्फत देईल किंवा भेसळ झाल्याचे माहीत नसलेल्या एखाद्या व्यक्तीकडून औषधोपचाराच्या प्रयोजनांसाठी (कारणाकरिता) त्याचा उपयोग करवील त्याला, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा पाच हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply