गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम २५ :
अपराध करण्यासाठी जागा इत्यादी वापरण्यास देण्याबद्दल शिक्षा :
कोणतेही घर, खोली, आवार, क्षेत्र, जागा, प्राणी किंवा वाहन याचा मालक असणारी किंवा त्याचा भोगवटा करणारी किंवा त्यावर नियंत्रण असणारी किंवा त्याचा वापर करणारी कोणतीही व्यक्ती या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीअन्वये शिक्षा होण्यास पात्र असलेला एखादा अपराध करण्यास अन्य एखाद्या व्यक्तीस जाणीवपूर्वक परवानगी देईल, तर ती त्या अपराधासाठी असलेल्या शिक्षेस पात्र ठरेल.
