गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम १६ :
कोका वनस्पती आणि कोका पत्ती यांच्या बाबत उल्लंघनाबद्दल शिक्षा :
जो कोणी या अधिनियमाच्या तरतुदीचे किंवा त्याखाली करण्यात आलेल्या कोणत्याही नियमाचे किंवा आदेशाचे किंवा त्यानुसार देण्यात आलेल्या कोणत्याही नियमाचे किंवा आदेशाचे किंवा त्यानुसार देण्यात आलेल्या अनुज्ञप्तीचे उल्लंघन करून कोका वनस्पतीचा कोणताही भाग गोळा करील किंवा कोका पत्तीचे उत्पादन करील, ती ताब्यात घेईल, त्याची विक्री, खरेदी, वाहतूक किंवा अंतरराज्यात आयात किंवा निर्यात करील किंवा वापर करील, तो दहा वर्षांपर्यंतच्या सक्त मजूरीच्या कैदेस आणि एक लाख रूपये पर्यंतच्या दंडास पात्र ठरेल.
