Ndps act कलम १२ : गुंगीकारक औषधी द्रव्यांच्या आणि मनोव्यापारांवर परिणाम करणाऱ्या पदार्थांच्या, देशाबाहर होणाऱ्या देवघेवीवरील निर्बंध:

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम १२ :
गुंगीकारक औषधी द्रव्यांच्या आणि मनोव्यापारांवर परिणाम करणाऱ्या पदार्थांच्या, देशाबाहर होणाऱ्या देवघेवीवरील निर्बंध:
केंद्र सरकारने आधी दिलेल्या अधिकाराने असेल आणि ते सरकार यासंबंधात घालून देईल अशा शर्तींच्या अधीन राहून असेल त्या व्यतिरिक्त इतर बाबतीत कोणतीही व्यक्ती, ज्या वापाराच्या योगे भारताबाहेर कोणतेही गुंगीकारक औषधी द्रव्य किंवा मनोव्यापारांवर परिणाम करणारा पदार्थ मिळवण्यात येत असेल आणि भारताबाहेरील कोणत्याही व्यक्तीला तो पुरवण्यात येत असेल असा कोणताही व्यापार करणार नाही किंवा त्यावर नियंत्रण ठेवणार नाही.

Leave a Reply