Ndps act कलम ११ : गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ, इत्यादी अटकावणी केली जाण्यास किंवा जप्त केले जाण्यास अपाय असणे:

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ११ :
गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ, इत्यादी अटकावणी केली जाण्यास किंवा जप्त केले जाण्यास अपाय असणे:
कोणत्याही कायद्यामध्ये किंवा करारामध्ये विरूद्ध अर्थाचे असे काहीही अंतर्भूत केलेले असले, तरी कोणत्याही न्यायालयाच्या किंवा प्राधिकारणाच्या कोणत्याही आदेशाखाली किंवा हुकूमनाम्याखाली अथवा अन्य प्रकारे कोणतेही गुंगीकारक औषधी द्रव्य, मनोव्यापारांवर परिणाम करणारा पदार्थ, कोका वनस्पती, अफूचे झाड किंवा कॅनॅबिस वनस्पती ही कोणत्याही पैशाच्या वसुलीसाठी कोणत्याही व्यक्तीकडून अटकावणी केली जाण्यास किंवा जप्त केली जाण्यास पात्र असणार नाही.

Leave a Reply