गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ७ब :
निधीमधून खर्च भागवलेल्या कार्यांचा वार्षिक अहवाल :
केंद्र सरकार, प्रत्येक वित्तीय वर्ष समापत झाल्यानंतर शक्य होईल तितक्या लवकर वित्तीय वर्षामध्ये कलम ७ (अ) खर्च भागवलेल्या कार्यांची माहिती देणारा अहवाल व त्यासोबत हिशेबांचे विवरणपत्र राजपत्रात प्रसिद्ध करण्याची व्यवस्था करील.
