Ndps act कलम ३ : मनोव्यापारांवर परिणाम करणाऱ्या पदार्थांच्या यादीमध्ये भर घालण्याचा किंवा यादीमधून वगळण्याचा अधिकार :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ३ :
मनोव्यापारांवर परिणाम करणाऱ्या पदार्थांच्या यादीमध्ये भर घालण्याचा किंवा यादीमधून वगळण्याचा अधिकार :
अ) कोणत्याही पदार्थाचे (नैसर्गिक किंवा कृत्रिम) किंवा नैसर्गिक समाग्रीचे किंवा अशा पदार्थांच्या अथवा समाग्रीच्या कोणत्याही क्षाराचे वा सिद्धपदार्थाचे स्वरूप आणि परिणाम व त्याचा दुरूपयोग अथवा दुरूपयोगास असलेला वाव याबाबत त्याला मिळालेली असेल, अशी माहिती, साक्षीपुरावा, आणि,
ब) असा पदार्थ नैसर्गिक सामग्री किंवा क्षार अशा पदार्थाचा अथवा समाग्रीचा कोणताही क्षार अथवा सिद्धपदार्थ यांच्या बाबत कोणत्याही आंतरराष्ट्रीय करारात करण्यात आलेले फरबदल किंवा तरतुदी (कोणत्याही असल्यास), यांच्या आधारे अनुसूचीमध्ये उल्लेख केलेल्या मनोव्यापारांवर परिणाम करणाèय पदार्थांच्या यादीमध्ये असा पदार्थ किंवा नैसर्गिक सामग्री किंवा अशा पदार्थांचा अथवा सामग्रीचा क्षार अथवा सिद्धपदार्थ याची भर घालणे किंवा प्रकरणपरत्वे त्या यादीमधून तो वगळणे आवश्यक किंवा समयोचित आहे. याबद्दल केंद्र सरकारची खात्री पटल्यास, त्याला राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अशी वगळणूक करता येईल किंवा भर घालता येईल.

Leave a Reply