Bns 2023 कलम २५६ : एखाद्या व्यक्तीला शिक्षेपासून किंवा मालमत्तेला सरकारी समपहरणापासून (जप्तीपासून) वाचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने चुकीच्या अभिलेखाची किंवा लेखाची मांडणी करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २५६ :
एखाद्या व्यक्तीला शिक्षेपासून किंवा मालमत्तेला सरकारी समपहरणापासून (जप्तीपासून) वाचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने चुकीच्या अभिलेखाची किंवा लेखाची मांडणी करणे :
कलम : २५६
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : एखाद्या व्यक्तीला शिक्षेपासून किंवा मालमत्तेला समपहरणापासून वाचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने चुकीच्या अभिलेखाची किंवा लेखाची मांडणी करणे.
शिक्षा : ३ वर्षांचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
जर कोणी लोकसेवक असून, आणि असा लोक सेवक म्हणून एखादा अभिलेख किंवा अन्य लेख तयार करण्याची त्याच्यावर जबाबदारी असून, जी रीत चुकीची असल्याचे स्वत:स माहीत आहे त्या रीतीने त्याने त्या अभिलेखाची किंवा लेखाची मांडणी केली आणि त्यायोगे लोकांना अगर एखाद्या व्यक्तीला हानी किंवा (क्षती) नुकसान पोचवण्याचा त्याचा उद्देश असेल, अगर ती पोचण्यास आपण कारण होणे संभवनीय असल्याची त्याला जाणीव असेल तर, अथवा त्यायोगे एखाद्या व्यक्तीला वैध (कायदेशीर) शिक्षेपासून वाचवण्याचा त्याचा उद्देश असेल तर, अगर ती वाचण्यास आपण कारण होणे संभवनीय असल्याची त्याला जाणीव असेल तर, अथवा त्यायोगे एखादी मालमत्ता विधित: (कायद्याने) ज्यास दायी असेल त्या समपहरणापासून (सरकारी जप्तीपासून) किंवा अन्य प्रभारापासून (बोजा पासून) वाचवण्याचा त्याचा उद्देश असेल किंवा ती वाचण्यास आपण कारण होणे संभवनीय असल्याची त्याला जाणीव असेल तर, त्याला तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतकया मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply