Bp act कलम ९९: सडकेसंबंधीचे नियम न पाळणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
प्रकरण ७ :
अपराध व शिक्षा :
कलम ९९:
सडकेसंबंधीचे नियम न पाळणे :
कोणत्याही व्यक्ती-
अ) रस्त्यावरुन वाहन हाकतेवेळी आणि प्रत्यक्ष आवश्यकता किंवा वाजवी कारण असल्याखेरीज, अशा सडकेच्या डाव्या बाजूने जाण्यात कसूर करणार नाही आणि एकाच दिशेने जाणाऱ्या इतर कोणत्याही वाहनाच्या बाजूने जाताना अशा वाहनाच्या उजव्या बाजून जाण्यात कसूर करणार नाही, किंवा
अपुरी राखण केलेली गुरेढोरे वगैरे रस्त्यावर राहू देणे.
ब) कोणत्याही रस्त्यात अपुरी राखण करुन किंवा अपुऱ्या रीतीने बांधलेले प्राणी किंवा वाहन राहू देणार नाही.

Leave a Reply