भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २४१ :
कोणताही दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख पुरावा म्हणून हजर केला जाऊ नये यासाठी तो नष्ट करणे:
कलम : २४१
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणताही दस्तऐवज पुरावा म्हणून हजर केला जाऊ नये यासाठी लपवणे किंवा नष्ट करणे.
शिक्षा : ३ वर्षांचा कारावास, किंवा ५००० रुपए द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
जो कोणी न्यायालयात किंवा लोकसेवक म्हणून एखाद्यासमोर कायदेशीरपणे चाललेल्या कार्यवाहीत जो कोणताही दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख पुरावा म्हणून हजर करणे स्वत:ला कायदेशीरपणे भाग असेल तो दस्तऐवज अशा न्यायालयासमोर किंवा लोकसेवकासमोर अथवा त्या प्रयोजनासाठी स्वत:ला कायदेशीरपणे समन्स पाठविण्यात येईल तेव्हा, किंवा तो हजर करण्यास फर्माविण्यात येईल तेव्हा पुरावा म्हणून हजर केला जाऊ नये किंवा वापरला जाऊ नये या उद्देशाने असा दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख संपूर्णत: किंवा त्याचा कोणताही भाग दिसेनाला करील किंवा दुर्वाच्य करील त्याला, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा पाच हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.