Bns 2023 कलम २३९ : अपराधाची माहिती देण्यास विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेला) असलेल्या व्यक्तीने माहिती देण्याचे उद्देशपूर्वक टाळणे:

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २३९ :
अपराधाची माहिती देण्यास विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेला) असलेल्या व्यक्तीने माहिती देण्याचे उद्देशपूर्वक टाळणे:
कलम : २३९
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अपराधाची माहिती देण्यास विधित: बद्ध असलेल्या व्यक्तीने माहिती देण्याचे उद्देशपूर्वक टाळणे.
शिक्षा : ६ महिन्यांचा कारावास, किंवा ५००० रुपए द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
अपराध घडला आहे हे माहीत असून किंवा तसे समजण्यास कारण असून, जो कोणी त्या अपराधाविषयी जी माहिती देण्यास विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेला) आहे अशी कोणतीही माहिती देण्याचे उद्देशपूर्वक टाळील त्याला सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा पाच रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply