भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २१९ :
लोकसेवकाच्या प्राधिकारान्वये (अधिकाराप्रमाणे) विक्रीस काढलेल्या मालमत्तेच्या विक्रीस अटकाव (हरकत) करणे :
कलम : २१९
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोकसेवकाच्या प्राधिकारान्वये विक्रीस काढलेल्या मालमत्तेच्या विक्रीला अटकाव करणे.
शिक्षा :१ महिन्याचा कारावास किंवा ५००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
लोकसेवक म्हणून एखाद्याला असलेल्या कायदेशीर प्राधिकारान्वये (अधिकाराप्रमाणे) विक्रीस काढलेल्या कोणत्याही मालमत्तेच्या विक्रीला जो कोणी उद्देशपूर्वक अटकाव करील त्याला, एक महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा पाच हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.