Peca कलम १७ : अडचणी दूर करण्याची शक्ती :

इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियम २०१९
कलम १७ :
अडचणी दूर करण्याची शक्ती :
१) या अधिनियमाच्या तरतुदी अमलात आणताना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास केंद्र शासन राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे, अडचण दूर करण्यसाठी त्याला आवश्यक किंवा इष्ट वाटेल अशा या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसतील अशा तरतुदी करील :
परंतु असे की, या अधिनियमाच्या प्रारंभापासून दोन वर्षांचा कालावधी समाप्त झाल्यानंतर या कलमान्वये कोणताही आदेश काढण्यात येणार नाही.
२) या कलमान्वये काढलेला प्रत्येक आदेश तो काढण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर संसदेच्या प्रत्येक सभागृहासमार मांडण्यात येईल.

Leave a Reply