सिगरेट और अन्य तंबाकू उत्पाद अधिनियम २००३
कलम १९ :
अपील :
(१) न्यायालयाच्या जप्तीबाबत न्यायनिर्णयामुळे, रक्कम चुकती करण्याच्या आदेशामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही व्यक्तीला, अशा न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध ज्या न्यायालयाकडे अपील होऊ शकते अशा न्यायालयाकडे अपील दाखल करता येईल.
(२) अपिलीय न्यायालय, अपीलकत्र्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर, त्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे, अपील करण्यात आलेला निर्णय कायम करणारा, त्यात फेरबदल करणारा किंवा त्यात बदल करणारा आदेश काढील किंवा आवश्यक असेल तर, अतिरिक्त पुरावा घेतल्यानंतर नव्याने निर्णय घेण्यासाठी किंवा अभिनिर्णयासाठी त्याला योग्य वाटतील अशा निदेशांसह ते प्रकरण परत पाठवील :
परंतु, अपीलकत्र्याला निवेदन करण्याची संधी दिली असल्याखेरीज आणि जर त्याची इच्छा असल्यास, त्याच्या बचावाबाबत त्याचे व्यक्तिश: किंवा प्रतिनिधीमार्फत म्हणणे ऐकून घेतल्याखेरीज या कलमाअन्वये, जप्त करण्याऐवजी दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा किंवा अधिकतम मूल्याचा माल जप्त करण्याचा आदेश देता येणार नाही.
(३) अपील न्यायालयाच्या आदेशाविरूद्ध पुढील अपील दाखल करता येणार नाही.
