Fssai कलम ६० : जप्त केलेल्या वस्तूंशी छेडछाड केल्याबद्दल शास्ती :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ६० :
जप्त केलेल्या वस्तूंशी छेडछाड केल्याबद्दल शास्ती :
जर कोणतीही व्यक्ती, अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय, या अधिनियमान्वये जप्त केलेले कोणतेही अन्न (खाद्य), वाहन, उपकरण, वेष्टण (पॅकेज) किंवा लेबल किंवा जाहीरातीची सामग्री किंवा इतर अन्य गोष्ट, स्वत:कडे ठेवील, काढून टाकील किंवा छेडछाड करील तर तो सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस आणि दोन लाख रुपयांपर्यंतच्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र होईल.

Leave a Reply