अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम २१ :
कीटकनाशके, पशुवैद्यकीय (पशुचिकित्सा) औषधी अवशेष, प्रतिजैविक अवशेष आणि सूक्ष्मजीव संख्या (काउंट) :
१) कोणत्याही अन्न (खाद्य) पदार्थामध्ये विनियमांद्वारे निर्देशित केलेल्या मानवणाऱ्या प्रमाणाच्या मर्यादेपेक्षा जास्त, कीटकनाशके, किटकनाशकांचे अवशेष, पशुवैद्यकीय (पशुचिकित्सा) औषधी अवशेष, प्रतिजैविक अवशेष, विद्रावक अवशेष, भेषजीय स्वरुपातील सक्रिय पदार्थ आणि सूक्ष्मजीव संख्या (काउंट), असता कामा नये.
२) कीटकनाशक अधिनियम १९६८ (१९६८ चा ४६) अन्वये नोंदणीकृत व मान्यताप्राप्त धूरीकरणाशिवाय (फ्यूमिंगट्स – जंतुनाशक किंवा कीटकनाशक म्हणून वापरलेले कोणतेही अस्थिर किंवा अस्थिर रासायनिक संयुग) कोणत्याही कीटकनाशकाचा वापर थेट कोणत्याही अन्न (खाद्य) पदार्थावर केला जाणार नाही.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी,-
१) किटकनाशकांचे अवशेष म्हणजे अन्नातील (खाद्यातील) कोणताही निर्दिष्ट पदार्थ जो कीटकनाशकाच्या वापरामुळे अन्नामध्ये (खाद्यामध्ये) येतो आणि त्यात कीटकनाशकाची व्युत्पत्ती जी पदार्थाच्या रुपांतराने, चयापचयाने, प्रतिक्रिया उत्पादनाने झाली असेल व यात अशुध्दके जी विष विज्ञानात महत्वाचा समजला जातो आणि यात वातावरणातून (पर्यावरणातून) अन्नामध्ये (खाद्यामध्ये) येणाऱ्या अवशेषांचाही समावेश होतो.
२) पशुवैद्यकीय (पशुचिकित्सा) औषधी अवशेष यांत मूळ संयुगे किंवा त्यांच्या चयापचय किंवा दोन्ही ज्या पशुखाद्यात मिसळल्या गेल्या आहेत व यांत संबंधित पशुवैद्यकीय (पशुचिकित्सीय) औषधांच्या संबंधित अशुद्धतेचे अवशेष देखील समाविष्ट असतात.
