Fssai कलम १५ : वैज्ञानिक समिती आणि वैज्ञानिक मंडळाची प्रक्रिया :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम १५ :
वैज्ञानिक समिती आणि वैज्ञानिक मंडळाची प्रक्रिया :
१) वैज्ञानिक समितीचे सदस्य, जे वैज्ञानिक मंडळाचे सदस्य नाहीत आणि वैज्ञानिक मंडळाजे सदस्य, त्यांची नियुक्ती अन्न (खाद्य) प्राधिकरणाद्वारे तीन वर्षाच्या कालावधीसाठी केली जाईल, जो कालावधी पुढील अशाच कालाच्या नुतनीकरणास पात्र असेल आणि यातील रिक्त जागांची सूचना (नोटीस) संबद्ध प्रमुख वैज्ञानिक प्रकाशनाद्वारे प्रकाशित केली जाईल त्याचबरोबर अन्न (खाद्य) प्राधिकरणाच्या संकेत स्थळावरही (वेबसाइटवर) प्रकाशित केली जाईल ज्याद्वारे इच्छुक आमंत्रणाची प्रक्रिया केली जाईल.
२) वैज्ञानिक समिती आणि वैज्ञानिक मंडळ प्रत्येकी आपापल्या सदस्यांमधून अध्यक्षाची निवड करतील.
३) वैज्ञानिक समिती आणि वैज्ञानिक मंडळ त्यांच्या सदस्यांच्या बहुमताने कार्य करतील आणि सदस्यांची मते नोंदविली जातील.
४) वैज्ञानिक समिती आणि वैज्ञानिक मंडळाची कार्यपद्धती व सहकार्याची पद्धती विनियमांद्वारे विनिर्दिष्ट केली जाईल.
५) या पद्धती विशेषत: निम्नलिखित संबंधात असतील, अर्थात :-
(a) क) कोणताही सदस्य सलग किती वेळा वैज्ञानिक समिती किंवा वैज्ञानिक मंडळावर सेवा करु शकेल, ती संख्या;
(b) ख) प्रत्येक वैज्ञानिक मंडळाच्या सदस्यांची संख्या;
(c) ग) वैज्ञानिक समिती आणि वैज्ञानिक मंडळाच्या सदस्यांच्या खर्चाचा परतावा करण्याची पद्धत;
(d) घ) वैज्ञानिक समिती आणि वैज्ञानिक मंडळाला ज्या पद्धतीने कार्ये आणि वैज्ञानिक मतांसाठी विनंती नियुक्त केल्या जातात त्या पद्धती;
(e) ङ) वैज्ञानिक समित्या आणि वैज्ञानिक मंडळे यांच्या कार्यकारी गटांची निर्मिती व आयोजन व कार्यकारी गटांत बाह्य विशेषज्ञांनाचा समावेश करण्याची संभाव्यता;
(f) च) वैज्ञानिक समिती आणि वैज्ञानिक मंडळांमध्ये निरीक्षकांना आमंत्रित करण्याची संभाव्यता;
(g) छ) लोकसुनावणीच्या आयोजनाची संभाव्यता; आणि
(h) ज) सभेची (बैठकीची) गणपूर्ती, सभेची सूचना (नोटीस), सभेची कार्यसूची व अशा इतर बाबी.

Leave a Reply