मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम ३९ :
सदस्य व अधिकारी हे लोकसेवक असणे :
आयोग, राज्य आयोग याचा प्रत्येक सदस्य आणि आयोग किवा राज्य आयोग यांच्याकडून या अधिनियमाखालील कार्य पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेला किंवा प्राधिकृत करण्यात आलेला प्रत्येक अधिकारी हा, भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) याच्या कलम २१ च्या अर्थानुसार लोकसेवक असल्याचे मानण्यात येईल.
