Bns 2023 कलम १४६ : बेकायदेशीर वेठबेगारी (अनिवार्य श्रम) :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १४६ :
बेकायदेशीर वेठबेगारी (अनिवार्य श्रम) :
कलम : १४६
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बेकायदेशीर वेठबिगारी.
शिक्षा : १ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड, किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जो कोणी बेकायदेशीरपणे कोणत्याही व्यक्तीवर, तिच्या इच्छेविरुद्ध श्रम करण्याची सक्ती करील त्याला, एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply