भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १४४ :
अपव्यापार केलेल्या व्यक्तीची पिळवणूक करणे :
कलम : १४४ (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अपव्यापार केलेल्या बालकाची पिळवणूक.
शिक्षा : किमान ५ वर्षांचा कठोर कारावास किंवा कमाल १० वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
——–
कलम : १४४ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अपव्यापार केलेल्या व्यक्तीची पिळवणूक.
शिक्षा : किमान ३ वर्षांचा कारावास किंवा कमाल ७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
१) जो कोणी, एखाद्या बालकाला अपव्यापार करुन आणले आहे हे माहीत असताना किंवा तसा विश्वास ठेवण्यास कारण असताना अशा बालकाला कोणत्याही रीतीने तिचे लैंगिक शोषण होईल अशा रीतीने कामावर ठेवील त्याला, पाच वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु जी दहा वर्षांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र असेल.
२) जो कोणी एखाद्या व्यक्तीला अपव्यापार करुन आणले आहे हे माहीत असाताना किंवा तसा विश्वास ठेवण्यास कारण असताना अशा व्यक्तीला कोणत्याही रीतीने तिचे लैंगिक शोषण होईल अशा रीतीने कामावर ठेवील त्याला, तीन वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु जी सात वर्षांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र असेल.