हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१
कलम ८ :
१.(अपराध हे विवक्षित प्रयोजनांसाठी दखलपात्र आणि जामीनयोग्य असणे आणि आपसात मिटविण्याजोगे नसणे :
१) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) ही या अधिनियमाखालील अपराधांना जणू काही ते अपराध दखली अपराध अस्लयाप्रमाणे, पुढील प्रयोजनांच्या बाबतीत लागू होईल :-
(a)क)(अ) अशा अपराधांचे अन्वेषण आणि;
(b)ख)(ब) (एक) संहितेच्या कलम ४२ मध्ये निर्देशिलेल्या बाबी ; आणि
दोन) एखाद्या व्यक्तीला अधिपत्राशिवाय किंवा दंडाधिकाऱ्याच्या आदेशाशिवाय अटक ;
या बाबी वगळून इतर प्रयोजने.
२) या अधिनियमाखालील प्रत्येक अपराध हा २.(जामीन योग्य नसणे) आणि न मिटवण्याजोगा असेल.)
——–
१. १९८४ चा अधिनियम क्रमांक ६३ याच्या कलम ७ द्वारे मूळ कलम ८ ऐवजी (१९-११-१९८५ पासून) समाविष्ट करण्यात आले.
२. १९८६ चा अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ७ द्वारे मूळ मजकुराऐवजी (१९-११-१९८६ पासून) समाविष्ट करण्यात आले.