भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १३६ :
गंभीर प्रक्षोभकारणावरुन हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे :
कलम : १३६
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : गंभीर व आकस्मिक प्रक्षोभकारणावरुन हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे.
शिक्षा : १ महिन्यांचा साधा कारावास, किंवा १००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : जिच्यावर हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग केली ती व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कोणत्याही व्यक्तीकडून गंभीर व आकस्मिक प्रक्षोभकारण घडल्यामुळे जो कोणी तिच्यावर हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करील त्याला, एक महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची किंवा एक हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
स्पष्टीकरण :
हे कलम हे कलम १३१ प्रमाणे त्याच स्पष्टीकरणास अधीन आहे.