भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १३० :
हमला :
जर कोणी कोणताही हावभाव किंवा कसलीही तयारी केली आणि असा हावभाव किंवा तयारी यामुळे जो कोणी तो हावभाव किंवा तयारी यामुळे, जो कोणी तो हावभाव किंवा तयारी करील तो समक्ष हजर असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत फौजदारीपात्र स्वरुपाचा बलप्रयोग करण्याच्या बेतात आहे अशी धास्ती त्या व्यक्तीच्या मनात निर्माण व्हावी असा त्यामागे त्याचा उद्देश असेल किंवा तसे होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव असेल तर, तो हमला करतो असे म्हटले जाते.
स्पष्टीकरण :
केवळ उच्चारलेले शब्द हे हमला या सदरात मोडत नाहीत. पण एखादी व्यक्ती जे शब्द उच्चारील त्यामुळे, ज्यायोगे तिचे हावभाव किंवा तयारी ही हमला म्हणून गणता येईल अशा प्रकारचा अर्थ त्या हावभावांना किंवा तयारीला प्राप्त होऊ शकेल.
उदाहरणे :
(a) क) (क) हा (य) वह मूळ उगारतो, (क) हा (य) वर प्रहार करण्याच्या बेतात आहे अशी त्यामुळे (य) ची समजूत व्हावी असा (क) चा उद्देश आहे किंवा तसे होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव आहे. (क) ने हमला केला आहे.
(b) ख) (क) एका चावऱ्या कुर्त्याची मुसकी सोडू लागतो, (क) हा कुर्त्याला (य) वर हल्ला चढवायला लावण्याच्या बेतात आहे अशी त्यामुळे (य) ची समजूत व्हावी असा (क) चा उद्देश आहे किंवा तसे होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव आहे. (क) ने (य) वर हमला केला आहे.
(c) ग) मी आता तुला झोडपून काढीन असे (य) ला म्हणत असता (क) हातात काठी घेतो. याबाबतीत, काही झाले तरी (क) ने उच्चारलेल्या नुसत्या शब्दांची गणना हमल्यामध्ये होऊ शकली नसती आणि अन्य कोणत्याही परिस्थितिविशेषाच्या अभावी नुसत्या हावभावाची गणना हमल्यामध्ये होऊ शकली नसती तरीही, उच्चारलेल्या शब्दांनी ज्याचा खुलासा झाला तो हावभाव हमला या सदरात मोडू शकेल.