भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ११९ :
मालमत्ता जबरीने घेण्यासाठी किंवा अवैध कृती करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत किंवा जबर दुखापत पोचवणे :
कलम : ११९ (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : मालमत्ता जबरीने घेण्यासाठी अथवा जे अवैध कार्य करण्यास भाग पाडण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोचवणे.
शिक्षा : १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——–
कलम : ११९ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट कोणत्याही प्रयोजनासाठी इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवणे.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
——–
१) जर कोणी इच्छापूर्वक एखाद्या व्यक्तीला दुखापत पोचवली आणि त्यामागे, ती पीडित व्यक्ती किंवा त्या पीडित व्यक्तीमध्ये हितसंबंधित असलेली कोणतीही व्यक्ती यांच्या कडून कोणतीही मालमत्ता किंवा मूल्यवान रोखा जबरीने घेण्याचा अथवा जे अवैध आहे किंवा ज्यामुळे अपराध करणे सुकर होऊ शकेल असे काहीतरी करण्यास पीडित व्यक्ती किवा अशा पीडित व्यक्तीमध्ये हितसंबंधित असलेली कोणतीही व्यक्ती यांना जबरीने भाग पाडण्याचा इरादा (उद्देश) असेल तर त्याला, दहा वर्षेपर्यंन्त असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
२) जो कोणी पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही प्रयोजनासाठी इच्छापूर्वक जबर दुखापत पोहचवेल, तो आजीवन कारावास किंवा दहा वर्षेपर्यंन्त असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.