माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम ७१ :
चुकीची माहिती देण्याबद्दल शास्ती :
जो कोणी कोणतेही लायसेन्स किंवा १.(डिजिटल सिग्नेचर) मिळवण्यासाठी नियंत्रकाला किंवा प्रमाणन प्राधिकरणाला चुकीची माहिती देईल किंवा त्यापासून महत्त्वाची गोष्ट लपवून ठेवील त्याला दोन वर्षापर्यंतची कारावासाची किंवा एक लाख रूपयांपर्यंतच्या दंडाची किंवा या दोन्ही शिक्षा होतील.
——–
१.सन २००९ चा अधिनियम १० च्या कलम २ द्वारे सुधारणा.
