Bns 2023 कलम १०७ : बालकास (अल्पवयीन मुलास) किंवा मनोविकल व्यक्तीस आत्महत्येला अपप्रेरणा (चिथावणी) देणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १०७ :
बालकाच्या (अल्पवयीन मुलास) किंवा मनोविकल व्यक्तीस आत्महत्येला अपप्रेरणा (चिथावणी) देणे :
कलम : १०७
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बालक अथवा मनोविकल व्यक्ति, इत्यादी ला आत्महत्येचे अपप्रेरण.
शिक्षा : मृत्यू किंवा आजीवन कारावास किंवा १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
जर कोणत्याला बालकाला, कोणत्याही मनोविकल व्यक्तीला, कोणतीही नशेच्या अवस्थेतील व्यक्ती हिने आत्महत्या केली तर, ज्याने कोणी अशी आत्महत्या करण्यास अपप्रेरणा (चिथावणी)दिली असेल त्याला मृत्युदंडाची किंवा आजन्म कारावासाची किंवा जास्तीत जास्त दहा वर्षे इत्यक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply