Bns 2023 कलम १०३ : खुनाबद्दल शिक्षा:

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १०३ :
खुनाबद्दल शिक्षा:
कलम : १०३ (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : खून.
शिक्षा : मृत्यू किंवा आजीवन कारावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय
———
कलम : १०३ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींच्या गटा द्वारा खून.
शिक्षा : मृत्यु किंवा आजीवन कारावास आणि द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय
———
१) जो कोणी खून करील त्याला मृत्यूची किंवा आजन्म कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
२) जेव्हा वंश, जात किंवा समुदाय, लिंग, जन्मस्थान, भाषा या कारणांवरून पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने खून केला, तेव्हा अशा गटातील प्रत्येक सदस्याला त्याच्या वैयक्तिक विश्वासाच्या आधारावर किंवा इतर कोणत्याही समरुप कारणास्तव, मृत्यू किंवा आजीवन कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडालाही पात्र असेल.

Leave a Reply