भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ८९ :
स्त्रीच्या संमतीशिवाय गर्भपात घडवून आणणे :
कलम : ८९
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : स्त्रीच्या संमतीशिवाय गर्भस्त्राव घडवून आणणे.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
जो कोणी वरील कलम ८८ मध्ये व्याख्या (वर्णन) करण्यात आलेला अपराध त्या स्त्रीच्या, मग ती स्त्री स्पंदितगर्भा (क्विक विथ चाईल्ड) असो अगर नसो, संमतीशिवाय करील त्याला, आजीवन कारावासाची किंवा दहा वर्षेंपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.