Passports act कलम ७ : पासपोर्ट आणि प्रवासपत्र यांची मुदत :

पारपत्र अधिनियम १९६७
कलम ७ :
पासपोर्ट आणि प्रवासपत्र यांची मुदत :
पासपोर्ट किंवा प्रवासपत्र हे विहित केले असेल तेवढ्या कालावधीपर्यंत अमलात राहील – मात्र तत्पूर्वी ते रद्द करण्यात आले तर गोष्ट अलाहिदा – आणि विविध वर्गाच्या पासपोर्टासाठी किंवा प्रवासपत्रांसाठी अथवा अशा प्रत्येक वर्गाखालील विविध प्रवर्गाच्या पासपोर्टासाठी किंवा प्रवासपत्रांसाठी वेगवेगळे कालावधी विहित करता येतील :
परंतु, पुढील बाबतीत, विहित कालावधीपेक्षा कमी कालावधीसाठीही पासपोर्ट किंवा प्रवासपत्र देता येईल :
(a)(क)(अ) ज्या व्यक्तीला पासपोर्ट किंवा प्रवासपत्र हवे आहे तिची तशी इच्छा असेल तर; किंवा
(b)(ख)(ब) एखाद्या बाबतीत, पासपोर्ट किंवा प्रवासपत्र कमी कालावधीसाठी देण्यात यावे असे जर पासपोर्ट प्राधिकरणाला सकारण वाटेल तर – मात्र, ती कारणे अर्जदाराला लेखी कळविण्यात येतील .

Leave a Reply