भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ७० :
सामूहिक बलात्कार :
कलम : ७० (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : सामूहिक बलात्कार.
शिक्षा : किमान २० वर्षांचा सश्रम कारावास किंवा आजीवन कारावास म्हणजे त्या व्यक्तीच्या नैसर्गिक जीवनाच्या उर्वरित कालासाठी कारावास व द्रव्यदंड पीडितेचा वैद्यकीय खर्च व पुनर्वसन यासाठी.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कलम : ७० (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : १८ वर्षा खालील स्त्री वर सामुहिक बलात्कार
शिक्षा : आजीवन कारावास म्हणजे त्या व्यक्तिच्या नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित आयुष्याच्या कालावधीसाठी सश्रम कारावासाची शिक्षा आणि द्रव्यदंडा सहित किंवा मृत्युदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
१) जेव्हा एखाद्या स्त्रीवर ज्यांचा मिळून गट होतो किंवा जे समान उद्देशांच्या पुष्ट्यर्थ कृती करतात अशी एक किंवा अनेक व्यक्ती बलात्कार करतील तेव्हा त्यांच्यापैकी प्रत्येकाने बलात्काराचा अपराध केला असल्याचे मानण्यात येईल आणि त्याला (प्रत्येकाला) वीस वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु आजीवन पर्यंत म्हणजे त्याच्या नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित कालावधीसाठी सश्रम कारावासाची शिक्षा होईल आणि द्रव्यदंडही होईल.
परंतु असे की, असा दंड हा पीडितेचा वैद्यकीय खर्च भागवण्यासाठी आणि तिच्या पुनर्वसनासाठी योग्य व वाजवी असेल इतका असेल.
परंतु आणखी असे की, या पोटकलमान्वये लादलेला कोणताही दंड हा पीडितेला देण्यात येईल.
२) जेव्हा एखाद्या १८ वर्षा खालील स्त्रीवर ज्यांचा मिळून गट होतो किंवा जे समान उद्देशांच्या पुष्ट्यर्थ कृती करतात अशी एक किंवा अनेक व्यक्ती बलात्कार करतील तेव्हा त्यांच्यापैकी प्रत्येकाने बलात्काराचा अपराध केला असल्याचे मानण्यात येईल आणि त्याला (प्रत्येकाला) आजीवन कारावासाची म्हणजे त्याच्या नैसर्गित आयुष्याच्या उर्वरित कालावधीसाठी शिक्षा होईल आणि द्रव्यदंड ही होईल;
परंतु असे की, असा दंड हा पीडितेचा वैद्यकीय खर्च भागविण्यासाठी आणि तिच्या पुनर्वसनासाठी योग्य व वाजवी असेल इतका असेल :
परंतु आणखी असे की, या पोटकलमा नुसार लादलेला कोणताही दंड हा पीडितेला देण्यात येईल.