Arms act कलम २८ : विवक्षित प्रकरणी अग्निशस्त्रांचा किंवा नकली अग्निशस्त्रांचा वापर करण्याबद्दल व ती कब्जात ठेवण्याबद्दल शिक्षा :

शस्त्र अधिनियम १९५९
कलम २८ :
विवक्षित प्रकरणी अग्निशस्त्रांचा किंवा नकली अग्निशस्त्रांचा वापर करण्याबद्दल व ती कब्जात ठेवण्याबद्दल शिक्षा :
जो कोणी, आपल्या किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या कायदेशीर अटकेचा किंवा स्थानबद्धतेचा प्रतिकार करण्याच्या किंवा त्यास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने एखाद्या अग्निशस्त्रांचा किंवा नकली अग्निशस्त्रांचा कोणत्याही प्रकारे वापर करील किंवा करण्याचा प्रयत्न करील तो, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास, १.(आणि द्रव्यदंडास) पात्र होईल.
स्पष्टीकरण :
या कलमातील नकली अग्निशस्त्र या शब्दप्रयोगास, कलम ६ मध्ये असलेलाच अर्थ आहे.
——–
१. १९८३ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम १० द्वारा किंवां द्रव्यदंडास किंवा दोन्हीस या मजकुराऐवजी (२२-६-१९८३ पासून) समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply